Tuesday, April 3, 2007

The first round

Saturday morning turned out to be nicer than anticipated (59F) for the first round of golf this year. Here's to many more such rounds this season ...

चुकली दिशा तरीही

विंदांची ही कविता वाचायला मिळाली, फार खोल आहे खरी ...

चुकली दिशा तरीही हुकलें न श्रेय सारें;
वेड्या मुसाफिराला सामील सर्व तारे.

...

चुकली दिशा तरीही आकाश एक आहे,
हें जाणतो तयाला वाटेल तेथ न्यारे.

आशा तशी निराशा, हें श्रेय सावधांचे;
बेसावधास कैसे डसणार हे निखारे.

इती विंदा करंदीकर.